आयकर विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. आयकर विभागात विविध पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अधिसूचना खूप दिवसांआधी जाहीर करण्यात आली होती. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल आहे. त्यामुळे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
स्टेनोग्राफर ग्रेड II, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. आयकर विभागात एकूण ५६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड II साठी २ जागा रिक्त आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी २८ जागा रिक्त आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी २६ जागा रिक्त आहेत.
स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे असावी.मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी.
स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १२वी पास असणे गरजेचे आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट करणे गरजेचे आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास केलेली असावी.
स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २५,५००, ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
१२वी पास ते ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. सरकारी विभागात नोकरी करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे.
Discussion about this post