इन्कम टॅक्स विभागात तुम्हीही नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इन्कम टॅक्समध्ये स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ही भरती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आयकर विभागातील या नोकरीसाठी तुम्ही incometaxhyderabad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या भरती मोहिमेत ५६ जागा भरल्या जाणार आहेत.
इन्कम टॅक्समधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२५ आहे. ही भरती स्पोर्ट्स कोटाअंतर्गत केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचा. त्यानंतर अर्ज करा.
स्टेनोग्राफर पदासाठी २ जागा रिक्त आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी २८ जागा तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी २६ जागा रिक्त आहेत. स्टेनोग्राफर पदासाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
स्टेनोग्राफर ग्रेड २ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे गरजेचे आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी पदवी प्राप्त केलेली असावी. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मॅट्रिकची परीक्षा पास केलेली असावी.
स्टेनोग्राफर पदासाठी २५५०० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे.
Discussion about this post