जळगाव : फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाल्यानंतर थंडी गायब झाली असून, तापमानात वाढ होऊ लागली आहे. दिवसाच्या तापमानात गेल्या चार दिवसात ४ अंशाची वाढ झाली आहे. सोमवारी शहराचा पारा ३३ अंशावर पोहचला होता. तर रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन पारा १५ अंशावर पोहचला होता.
तसेच आगामी काही दिवसात तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, फेब्रुवारी मध्यापर्यंत जळगाव शहराचा पारा ३५ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
तापमानात वाढ झाल्यानंतर त्यामुळे समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र विकसीत होते, अशाच प्रकारचे वातावरण पुढील काही दिवसात निर्माण होऊ शकते. त्याचा परिणामस्वरुप पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हिवाळ्यातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. यासह यंदाच्या उन्हाळ्यावर एलनिनोचा प्रभाव जाणार असून, त्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र राहण्याचीही शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ यांनी दिली.















Discussion about this post