जळगाव : काही दिवसापूर्वी अख्या राज्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली असून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या आहे. मात्र अद्यापही भाजप आमदार गायकवाड यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जळगावमध्ये ठाकरे युवा सेना आक्रमक झाली. या विरोधात ठाकरे गट युवासेनेने रस्त्यावर उतरत राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले.
ठाकरे गटाने निदर्शने करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणी ठाकरे गट युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.















Discussion about this post