जळगाव । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, जळगाव शहरातील कांचननगर परिसरात तरुणावर जून्या वादातून तिघांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.पवन अशोक कोळी (वय- ३०, रा. डीएनसी कॉलेजवळ, जळगाव) असं जखमी तरुणाचे नाव आहे.
शहरातील डीएनसी महाविद्यालयाजवळ पवन अशोक कोळी हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रविवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पवन हा कांचनगर परिसरात चिकन घेण्यासाठी दुचाकीने जात होता. याचवेळी तिघ तरुणांनी त्याच्यासोबत वाद घालित त्याला मारहाण केली. या वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून तिघांपैकी एकाजणाने पवनवर धारदार शस्त्राने वार केले.
यामध्ये पवन हा गंभीर जखमी झाला असून त्याला लागलीच काही जणांनी दुचाकीवरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर पवनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहे. या घटनेत पवनच्या वाहनाचे नुकसान देखील करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, गुन्हे शाखेचे कर्मचारी राहुल पाटील, अनिल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत ते संशयितांचा शोध घेत आहे. जून्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Discussion about this post