यावल । तालुक्यातील चितोडा येथील एका २३ वर्षीय तरुणाने संतापाच्या भरात शेतातील विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केलीय. दुर्गस संतोष किनगे वय२३वर्ष असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहीती अशी की दुर्गस संतोष किनगे या तरूणाने दिनांक २८ सप्टेंबर गुरूवार रोजी वाजेच्या सुमारास यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे सदरच्या या अविवाहित तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाहीय.
या घटनेची खबर यावल पोलीस ठाण्यात गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांनी दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे . मयत तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे आणी वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी केले .
Discussion about this post