मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट. मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आमरण उपोषण मागे घेतलं आहे.
१७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करु असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, उपोषण सोडत असताना त्यांनी आज पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवली सराटी सारखी लाठीचार्जची घटना घडवून आणायची होती. त्यांना राज्यात दंगल घडवायची होती. पण मी तसं होण्यापासून वाचवलं, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
Discussion about this post