नवी दिल्ली । मोदी सरकारचा 3.0 चा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४-२५ अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करत असून यावेळी अनेक मोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. 1 कोटी तरुणांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल. या कालावधीत तुम्हाला दरमहा 5000 रुपये मिळतील. विशेष म्हणजे या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधींचा अनुभव घेता येणार आहे.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर.
32 पिकांसाठी 109 वाण लाँच करणार.
कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य.
मोफत रेशनची व्यवस्था ५ वर्षे सुरू राहील.
यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद.
रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे.
बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा.
बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल.
पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम.
बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल.
बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी 26 हजार कोटींची तरतूद.
विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज.
प्रथमच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ
नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य
पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा ३०० रुपये अतिरिक्त पीएफ देणार आहे.
स्थानिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित शैक्षणिक कर्ज उपलब्ध होईल.
युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 30 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळणार आहे.
यासाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते.
केंद्र सरकार ४.१ कोटी तरुणांना रोजगारासाठी पाच योजना आणणार आहे.
येत्या 5 वर्षात सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.
खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.
100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.
महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.
Discussion about this post