मुंबई | महाराष्ट्रात पोलीस भरतीसंदर्भात महत्वाची बातमी असून मुंबई पोलीस दलात तब्बल तीन हजार पदे ११ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय झाला असल्याचे म्हटले जात होते. मात्र यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई पोलिस दलात पोलिस भरती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची होणार असल्याचे बातमी आली. ही पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची नसल्याचे गृहविभागाने म्हटले आहे. यासंदर्भात माहिती गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली आहे.
पोलीस दलातील प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. पोलीस भरती करुन नियमित पोलीस होईपर्यंत मुंबईची कायदा-सुव्यवस्था वार्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3000 मनुष्यबळ भरण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोपर्यंतसाठी आहे. नियमितत पोलीस उपलब्ध झाल्यास त्यांची सेवा घेण्यात येणार नाही, असे गृहविभागाने स्पष्ट म्हटले आहे.
भरती प्रक्रिया सुरु आहे
आधीच्या सरकारने आठ हजार शिपाई आणि वाहनचालक या पदांची भरती सुरू केली होती. भरतीप्रक्रिया निवड केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत राज्य सुरक्षा महामंडळाकडून कर्मचारी घेतले जाणार होते.