जळगाव । पाणीपुरवठ्याबाबत जळगाव शहरवासीयांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शनिवारी होणारा शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामागील कारण म्हणजे राज्य वीज वितरण विभागातर्फे १२ केव्ही उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शनिवारी (ता. २०) वीजपुरवठा बंद राहणार आहे. उद्या ज्या भागात पाणीपुरवठा आहे, त्या भागात रविवारी (ता. २१) पाणीपुरवठा होईल, तसेच त्याच क्रमाने शहरातील सर्वच भागांतील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला जाईल. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे
असा होईल पाणीपुरवठा
रविवारी (ता. २१) खंडेरावनगर, पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजा वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर-निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकी दुसरा दिवस नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, डीएसपी बायपास तांबापुरा शामा फायरसमोरील परिसर.
डीएसपी टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवननगर बाहेती शाळा आदी, गिरणा टाकीवरून भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर मेहरुण भागातील राहिलेला परिसर, बुस्टर पंपावरून मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्बाल कॉलनी, एकनाथनगर-मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर, सद्गुरूनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर.
Discussion about this post