लोकप्रिय आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. मिथुन चक्रवर्ती याना कोलकात्यातील अपोलो रूग्णालयाध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करीत आहेत. ७३ वर्षीय मिथुन यांना मध्यरात्रीच स्ट्रोक आला होता. त्यानंतर लगेचच अभिनेत्याला रूग्णालयाध्ये दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्यावर रुग्णलयातल्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. अद्याप तरी अभिनेते मिथुन यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही . नुकतेच मिथुन यांना चित्रपटसृष्टीतील अमुल्य योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या सिनेकारकिर्दित स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनय आणि डिस्को डान्सर अभिनेता म्हणून त्यांची ओळख इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना पुर्वी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आपल्या सिनेकरिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिथुन यांना आपल्या सिनेकारकिर्दीत एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
Discussion about this post