अकोला । लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अद्यापही शेवटचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरलेला नाही. यातच प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा उमेदवारी अर्जाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. येत्या २७ तारखेला ते अकोला मतदाररंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत
लहान पक्षांना समावेश करून घ्यावं यासाठी आम्ही मागणी केली होती मात्र मविआकडून प्रतिसाद मिळाला नाही. फॉर्म भरायला त्यांना वेळ लागतो ज्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. युतीबाबत अजून आमची तयारी झाली नाही. मी 27 तारखेला अकोल्यातून फॉर्म भरणार आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं.
महाविकास आघाडीबरोबरच्या युतीवर बोलताना ते पुढे म्हणाले की, अजूनही मविआ आणि आमचं काही ठरलेलं नाही. काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेत. चार जागा आम्ही त्यांना देतो त्यांनी लढावं. ज्यांना जे काही बोलायचं त्यांना ते बोलूद्या,आम्ही काही बोलणार नाही. आमचा निर्णय आम्ही 26 तारखेला जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
ज्या पद्धतीने उमेदवार पळवापळवी सुरु आहे त्यावरून यांची ताकद फार दिसत नाही. मोठ्या पक्षाकडं उमेदवार नाहीत, आम्ही सात जागांवर काँग्रेसला सपोर्ट करायला आजही तयार आहोत. चारशे पार हा नारा राज्यशासन करण्यासाठी नाही, तर संविधान बदलण्यासाठी आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
Discussion about this post