मुंबई | राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घेतला असून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, अशातच आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्ह्यांना आज (26 जुलै) रेड अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना ऑरेन्ज आणि यलो अलर्टही दिला गेला आहे. यात आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो जारी करण्यात आला आहे.
या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट
आयएमडीनुसार, कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 असे एकूण 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट?
तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिलाय. त्यामुळे या 4 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
यलो अलर्टचा इशारा कोणत्या जिल्ह्यांना?
पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.
Discussion about this post