जळगाव । भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोथा चक्रीवादळाचा प्रभाव हळुहळु कमी होत आहे. मात्र त्यामुळे आता पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह आज कोकणातील रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा, तर पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह, हलक्या पावसाची, तसेच कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान हवामानात होणाऱ्या चढउताराने ताप, सर्दी, खोकला सारखे आजार डोकं वर काढत आहेत. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, आजचा संपूर्ण दिवस महत्त्वाचा असून राज्यात ऊन पावसाचा लपंडाव कायम राहणार आहे.















Discussion about this post