मुंबई । मागील काही दिवसापासून राज्यात थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाच्या चटक्यात वाढ झाल्याने राज्यातील जनजीवन त्रस्त झाले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमान वाढले असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर गेला आहे.
हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाने 36 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली आहे.
राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून आकाश निरभ्र राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक नोंदवला गेला आहे. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात ही वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 5 दिवसात राज्यात किमान व कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिकच असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात हळूहळू तापमानात वाढ होईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राने कळवले आहे.
Discussion about this post