जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. मात्र वाऱ्यामुळे सर्वत्र धूळ पाहायला मिळाली.
जळगावात गेल्या अनेक दिवसापासून उन्हाचा प्रकोप पाहायला मिळाला. वाढत्या तापमानामुळे उकाडा प्रचंड वाढला होता. यामुळे जळगावकर चांगलाच वैतागला होता. पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा पाहत होता. अखेर आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली.
४ ९ जून, १२.१५ दुपार, राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नंदूरबार, नाशिक, जळगाव, ढगाळ आकाश …
गडगडाटासह पावसाची शक्यता पुढच्या 2,3 तासात. pic.twitter.com/p0bGc2hVRd— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2023
त्यापूर्वी जोरदार वाऱ्यामुळे शहरासह परिसरात सर्वत्र धूळ पाहायला मिळाली. वादळामुळे शहरातील काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अचानक आलेल्या वादळामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सध्या विजांच्या गडगडाटीसह पाऊस सुरु आहे.
हवामान खात्याने धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नाशिक आणि जळगाव पुढील ३-४ तासांत निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केली आहे.
Discussion about this post