जळगाव/पुणे । जळगावसह राज्यभरात मागील काही दिवसापासून उन्हाचा चटका वाढला आहे. मात्र यातच मागील दोन दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह परतीच्या पावसाने हजेरी. पुढील दोन ते दिवस मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आज राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्यानंतर राज्याभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. तसेच नगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, काल सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकटासह पावसाने हजेरी लावली होती. आजही अनेक भागात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. परतीचा पाऊस हा गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. हा परतीचा पाऊस दोन पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.















Discussion about this post