नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी असून आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. विशेष या भरतीसाठी कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाहीय. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख 27 मे 2024 निश्चित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरले जाणारे पद आणि आवश्यक पात्रता –
1. संशोधन अधिकारी- 01 पद
पात्रता – लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी
2. वरिष्ठ संशोधन अधिकारी – 01 पद
पात्रता – एका वर्षाच्या अनुभवासह लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी माता आणि बाल आरोग्यामध्ये काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव; आणि लहान क्षेत्र अंदाज संशोधन प्रकल्प.
3. कनिष्ठ गुणात्मक संशोधक – 01 पद
पात्रता – सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
4. वरिष्ठ गुणात्मक संशोधक – 03 पद (IIPS Recruitment 2024)
पात्रता – सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी
5. गुणात्मक सल्लागार – 01 पद
पात्रता – सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
मिळणारे वेतन – 50,000/- रुपये ते 1,30,000/- रुपये दरमहा
मुलाखतीचे ठिकाण – इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मुंबई 400 088.
मुलाखतीची तारीख – 27 मे 2024
जाहिरात पहा – PDF
Discussion about this post