नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयएम मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयएएस मुंबईमधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. iimmumbai.ac.inhttp://iimmumbai.ac.in या वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
आयआयएम मुंबईमध्ये असोसिएट मॅनेजर, असिस्टंच मॅनेजर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.
पात्रता
असोसिएट मॅनेजर (सिविल/ आयटी/ इलेक्ट्रिकल)- उमेदवारांनी सिविल इंजिनियर / इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत ४-८ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. आयटी किंवा सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी बी.ई/ बीटेक / कॉम्प्टयुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
असिस्टंट मॅनेजर पदासाठी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावा. याचसोबत ३ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा.
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी हिंदी विषयात मास्टर्स केलेले असावे. त्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान असायला हवे. उमेदवाराकडे ट्रान्सलेशनचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे एकूण ६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. तुम्ही iimmumbai.ac.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ३० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे.















Discussion about this post