इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी पार उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. कंस्ट्रक्शन आणि मेंटेनेंस डिवीजनमध्ये ही भरती जाहीर करण्यात आली आहे. कंसल्टंट, सीनियर कंसल्टंट, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून त्वरित अर्ज करावा. या नोकरीसाठी तुम्ही २० एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात.
रिक्त पदांचा तपशील?
कंसल्टंट पदासाठी १ जागा रिक्त आहे. सिनियर कंसल्टंटसाठी १ जागा, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट पदासाठी १ जागा रिक्त आहे.
पात्रता :
कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech (सिविल/इलेक्ट्रिकल)पदवी प्राप्त केलेली असावी. सिनियर कंसल्टंट (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह) पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असावे. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट पदासाठी ग्रॅज्युएशन आणि इंग्लीश टायपिंग स्पीडचा कोर्स केलेला असावी. एम.एस. ऑफिस यायला हवे. या नोकरीसाठी तुम्हाला ६०००० रुपये पगार मिळणार आहे.
इथे पाठवा अर्ज?
सिनियर कंसल्टंट पदासाठी उमेदवारांना बायोडाटा, कागदपत्रे acdadmin@ignou.ac.in या मेलवर पाठवायचे आहे. कंसल्टंट पदासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तो भरुन डेप्युटी रजिस्टर, रिक्रूटमेंट सेल, ब्लॉक ७, रुम नं १३, IGNOU,मैदानगडी, नवी दिल्ली-११००६८ येथे पाठवायचा आहे.















Discussion about this post