पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँकेत सध्या भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती होणार असून चांगल्या बँकेत ऑफिसर होण्याची संधी आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती idbibank.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ एप्रिलपासून सुरु झाली आहे. म्हणजे आजपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) या भरती मोहिमेत एकूण ११९ पदे भरती केली जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्ही २० एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात. मुदतीपूर्वी अर्ज केल्यावरच तो स्विकारला जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.
आयडीबीआय बँकेतील या भरती मोहिमेत डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड डीसाठी ८ जागा रिक्त आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीसाठी ४२ जागा रिक्त आहेत. मॅनेजर ग्रेड बी पदासाठी ६९ जागा रिक्त आहेत. ही भरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये केली जाणार आहे. यामध्ये आयटी, फायनान्स, लिगल अशा विविध विभागात भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत कामाचा अनुभव असायला हवा.२८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.
Discussion about this post