सरकारी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयन्त करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. आयडीबीआय बँकेत सध्या भरती सुरु आहे. आयडीबीआय बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ६५० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहे. १ मार्च ते १२ मार्च २०२५ पर्यंत ही अर्जप्रक्रिया सुरु राहणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. www.idbibank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ()
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कॉलेजमधून कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २५ वर्षे असायला हवी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागणार आहे. (IDBI Bank job)
या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. ऑनलाइन टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीत पास झाल्यावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Discussion about this post