तुम्हीही सरकारी बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँकेत काही पदांसाठी भरती होत असून याबाबत बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे.
IDBI बँकेत तब्बल ५० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरात लवकर सुरु होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
या नोकरीसाठी एकूण ५६ पदे भरती केली जाणार आहेत. यात २५ पदे ही असिस्टंट जनरल (AGM) ग्रेड सी आणि ३१ पदे ही ग्रेड बीसाठी आहेत. एजीएम ग्रेड सीसाठी उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे तर मॅनेजर ग्रेड बीसाठी उमेदवार ग्रॅज्युएट असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इतर ठिकाणी कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मॅनेजरसाठी उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १ हजार शुल्क भरावे लागणार आहे.तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक १ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. १५ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही www.idbibank.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
Discussion about this post