सरकारी बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत एकूण १००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कार्यकारी (विक्री आणि संचालन) पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. आयडीबीआय बँक मोहिमेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ७ नोव्हेंबरपासून लिंक सक्रिय करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवार बँकेच्या https://www.idbibank .in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येईल.
बँकेने घालून दिलेल्या शैक्षणिक अटीनुसार उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक आणि आयटी संबंधित ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय हे २० ते २५ वर्षाच्या दरम्यान असावे. त्यानुसार उमेदवाराचा जन्म हा २ ऑक्टोबर १९९९ पूर्वी आणि १ ऑक्टोबर २००४ नंतर झालेला नसावा.. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा यात सूट देण्यात आली आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी २५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे. तर अन्य सर्व उमेदवारांना १०५० रुपये अर्ज शुल्क आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.















Discussion about this post