तुम्हीही रेल्वेत नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. इंडियन रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. तब्बल १०१० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
या नोकरीसाठी तुम्ही pb.icf.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. या भरती मोहिमेत कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, पेंटर, वेल्डर, मेडिकल लॅब टेक्निशियन अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पात्रता
रेल्वेमधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी आणि सायन्स स्ट्रीममधून १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच ITI संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.
या नोकरीसाठी १५ ते २२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन याबाबत माहिती मिळवा.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगच्या काळात स्टायपेंड दिली जाईल. १०वी पास तरुणांनी ६००० रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. तर १२वी पास आणि आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त उमेदवारांना ७००० रुपये मिळणार आहे.
Discussion about this post