इंटेलिजेंस ब्युरोमध्ये मेगाभरती जाहीर करण्यात आली असून पदवी पास असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.
तब्बल ३७१७ पदांसाठी ही भरती होणार आहे. इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे. (Intelligence Breau Recruitment)
या नोकरीसाठी उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर www.mha.gov.in जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे.
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड २/एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. लेव्हल सी पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी विविध प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पात्रता :
इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावे. तसेच कॉम्प्युटरचे ज्ञानदेखील असावे.
पगार आणि वयोमर्यादा
या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल ७ नुसार ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय इतर अनेक भत्तेदेखील दिले जातील.
निवड प्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.यामध्ये दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होतील. पहिला पेपर हा करंट अफेअर्स, जनरल नॉलेज,रिझनिंग, इंग्रजी विषयांसाठी होणार आहे. तर दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post