गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटिलिजन्स ब्युरोमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक व पात्र उमेदवार https://www.mha.gov.in/en या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 जून 2023 आहे.
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा?
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदाच्या एकूण 797 जागा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 325 जागा, ईडब्ल्यूएससाठी 79 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 215, एससी प्रवर्गासाठी 119 आणि एसटी प्रवर्गासाठी 59 जागा समाविष्ट आहेत.
वयाची अट : अर्ज करणारे उमेदवार हे 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत. सरकारी नियमानुसार एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
परीक्षा शुल्क : खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना 450 रुपये शुल्क भरावं लागेल. एससी, एसटी आणि माजी सैनिकांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या क्षेत्रात डिप्लोमा इंजिनीअरिंग किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स, गणित या विषयातील स्पेशलायझेशनसह सायन्स शाखेत ग्रॅज्युएशन केलेले इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
असा करा ऑनलाइन अर्ज
– इंटिलिजन्स ब्युरो (IB) च्या https://www.mha.gov.in/en या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– वेबसाइटवर ‘Recruitment’ किंवा ‘Career’ ऑप्शनवर क्लिक करा.
– कनिष्ठ गुप्तचर अधिकारी भरतीसाठी जाहिरात/अधिसूचना शोधा, आणि त्यावर क्लिक करा.
– पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर महत्त्वाच्या सूचनांसह तपशीलवार सूचना काळजीपूर्वक वाचा.
– अधिसूचनेत दिलेल्या ‘Apply Online’ किंवा ‘Registration’ लिंकवर क्लिक करा.
– अचूक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रं अपलोड करा आणि अर्ज फी भरा. अर्जाचे फायनल सबमिशन करण्यापूर्वी तो पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा, व अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट घ्या.
Discussion about this post