जर तुमचीही चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करायची इच्छा असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड कंपनीत टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये ३९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रेग्युलर नियुक्ती ३५ पदांसाठी होणार आहे. एफटीसी पदासाठी ४ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.
या पदांसासाठी होणार भरती
हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. गोरखपुर, सिंदरी बरैनी येथे ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी ३० ते ५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएट, लॉ ग्रॅज्युएट किंवा पीजी डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्ही https://jobse3.hurl.net.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला ई-मेल आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
यानंतर तुमचा फोटो, सही आणि स्कॅन कागदपत्रे अपलोड करायची आहे.
यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट काढा.
पगार
उपाध्यक्ष पदासाठी जवळपास ४८ लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. महिन्याला ₹1,20,000 – ₹2,80,000 पगार मिळणार आहे. अॅडिशनल चीफ मॅनेजर पदासाठी ३४ लाखांचे पॅकेज असणार आहे. सीनियर मॅनेजर पदासाठी ३०.३० लाख रुपये पगार मिळणार आहे. मॅनेजर पदासाठी २६.५० रुपये पगार मिळणार आहे.सिनियर इंजिनियर पदासाठी १५.९० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.
निवडप्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवार एक वर्षाच्या प्रोबेशन पीरियडवर असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांचा कामाचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे. तुमच्या पर्फॉर्मन्सवर पुढे २ वर्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह पदासाठी शॉर्टलिस्टेड झालेल्या उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू किंवा स्किल एसेसमेंट ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
Discussion about this post