मुंबई । गुजरातमधील वलसाडमध्ये आज शनिवारी हमसफर एक्स्प्रेसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. गाडी थांबताच प्रवासी तात्काळ उतरले. माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ट्रेनला आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनमधून धुराचे फुगे उठताना दिसत आहेत.
हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जात होती. वलसाडच्या छिपवाडमध्ये रेल्वेच्या बोगीत अचानक भीषण आग लागली. आग लागताच लोको पायलटने ट्रेन थांबवली. प्रवासी बोगीमध्ये ही आग लागली. यानंतर आगीच्या बोगीतून प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
#WATCH गुजरात: हमसफर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन में वलसाड में आग लगने की घटना सामने आई है। ट्रेन मुंबई से अहमदाबाद जा रही थी। यात्रियों को ट्रेन से उतार दिया गया है। अभी तक किसी के हताहत होने की सूचना नहीं है। pic.twitter.com/yOz6ysc7Mx
— ANI_HindiNews (@AHindinews) September 23, 2023
हमसफर एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती मिळताच नजीकच्या रेल्वे स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवली. रेल्वे प्रशासनाच्या पथकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेचे पथक या घटनेचा तपास करत आहे. आता या मार्गावरील पुढील गाड्या थांबवण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
Discussion about this post