बंगळुरू । आयपीएल 2025 च्या हंगामाचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने पटकावले. त्यामुळे बंगळुरू येथे विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या विजयी रॅलीला गालबोट लागले असून या रॅलीत चेंगराचेंगरी झाली असून तब्बल ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबवर मोठा विजय मिळवल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हादेखील येणार होता.
एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बाहेर बंगळुरू संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र याच वेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.
धक्कादायक बाब म्हणजे या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ७जणांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तर 15 ते 20 जण यात जखमी झाले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post