तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता थलापती विजय यांच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ पुरुष, १६ महिला आणि १० मुले आहेत. या चेंगराचेंगरीत ९५ हुन अधिक जण जखमी झाले आहेत. तर काहीजण बेपत्ता झाल्याचीही माहिती आहे. विजय थलापती यांनी या घटनेवर एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की रॅली आयोजकांना सुमारे १०,००० लोकांची गर्दी अपेक्षित होती. मात्र, लोक येऊ लागले तसे, हा प्रवाह थांबणे अशक्य वाटले. करूर येथील रॅली मैदानावर सुमारे २७,००० लोक जमले होते. चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला. ९५ हुन अधिक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.दरम्यान, या चेंगराचेंगरीचे खरे कारण चौकशीनंतरच कळेल असे तामिळनाडूच्या डीजीपींनी म्हटले आहे.” त्यांनी सांगितले की, चौकशीसाठी एक सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.
या घटनेची दखल तामिळनाडू सरकारनेही घेतली आहे. करूर येथील रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
रॅलीत काय घडले?
विजयने २०२४ मध्ये तमिलगा वेत्री कळघम नावाची पार्टी सुरू केली. तो तीन दशकांपासून तमिळ चित्रपटसृष्टीत स्टार आहे. विजयने काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास भाषण सुरू केले होते तेव्हा चेंगराचेंगरी झाली. लोक सकाळपासून त्याची वाट पाहत होते. प्रचंड आवाज आणि तीव्र उष्णतेमुळे लोक बेशुद्ध पडले. अनेक मुले आणि महिला बेशुद्ध पडल्या. त्यानंतर विजयने आपले भाषण थांबवले आणि गर्दीला पाण्याच्या बाटल्या वाटण्यास सुरुवात केली. त्यांनी पोलिसांना परिस्थिती हाताळण्याचे आवाहनही केले.















Discussion about this post