हिंदुस्तान शिपयार्डमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष या भरतीसाठी कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाहीय. हिंदुस्तान शिपयार्डमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मॅनेजर, कंसल्टंट, प्रोजेक्ट सुपरिटेंडेंटसह अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. hslvizag.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.
हिंदुस्तान शिपयार्डमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी एकूण ४७ पदांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ९ ऑगस्च २०२५ पूर्व अर्ज करु शकतात. नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
हिंदुस्तान शिपयार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन डिग्री, बी.टेक/बी.ई, डिप्लोमा, एमबीए, पीजीडीएम आणि एलएलबी पदवी प्राप्त केलेली असावी. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.
मॅनेदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा४० वर्षे असावी, प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट पदासाठी ५७, डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी ४० किवा ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
पगार
मॅनेजर पदासाठी ६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट पदासाठी १,७०,००० रुपये पगार मिळणार आहे. डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी ७३,००० रुपये पगार तर सिनियर कंसल्टंट पदासाठी १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. कंसल्टंट पदासाठी १ लाख रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post