जळगाव । राज्यातील बहुतांश शहरातील तापमानाचा पारा वाढला यामुळे उन्हाचे चटके बसत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमान ३६ अंशावर गेल्याने उन्हाच्या झळा बसत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाचा आरोग्यावर थेट परिणाम दिसायला लागला असून घामाघूम होत असल्याने शरीरातील पाणी कमी होऊन घशाला सतत कोरड पडते. यंदा अलनिनो’ इफेक्ट नसला तरी प्रभाव राहील. यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे.
यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो. झळा वाढल्याने डोक्याला पांढरे रुमाल, मुली सनकोटचा वापर वाढला आहे. शरीरातील अंतर्गत तापमान नियंत्रण गमावल्यामुळे उष्णतेच्या कॅम्प्स, उष्मा, थकवा, उष्माघात आणि अति उष्णतेमुळे हायपरथर्मिया यासह विविध आजार होऊ शकतात.
त्यासाठी शरीरातील पाणी टिकविणे अत्यंत महत्वाचे असा सल्ला आहार तज्ञांनी दिला आहे. मार्च महिन्यातच शहराचे तापमान वाढल्याने अतिसार, पचनक्रियेशी संबंधित आजार, हिटस्ट्रोकसह त्वचे संदर्भात समस्याही उद्भवतात. वाढणे, काम कमी केले तरी दम लागण्याचे प्रकार घडतात.
अशी घ्या काळजी
* शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही
* दुपारी १२ ते ४ उन्हात बाहेर फिरणे टाळा
* उन्हात छत्री, टोपी, हेल्मेट सुरक्षा कवच वापरा
* बाहेर जाताना स्वच्छ पाण्याची बाटली घेऊन निघा
* उन्हाळ्यात शक्यतो सैलसर, सुती कपडे वापरा
* गॉगल, रुमाल अथवा पूर्ण कपडे, चप्पल वापरा
उन्हाळ्यात आहारात पाणीदार फळांचा आहारात समावेश असावा. कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे, आंबा, अंजीर, डाळिंब यांचा आहारात समावेश करावा, लिंबूवर्गीय फळे ‘सी’ जीवनसत्त्वासाठी चांगली. शिवाय आवळा, कोकम, कैरी यांच्यातही ‘सी’ जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.














Discussion about this post