मुंबई । सध्या देशात लोकसभा निवडणुका पार पडत असून या निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकेल याबाबत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी हवा सध्या महाविकास आघाडीची असल्याची दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
महाराष्ट्रात होत असलेल्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता आज मुंबईमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर जोरदार टीका केली.पीएम मोदी जातील तिकडं फूट पाडण्याचे काम करत आहेत, महाराष्ट्रात सभा घेत आहेत. कोणत्याच पंतप्रधानांनी भडकावण्याचे काम केलं नाही, मी 53 वर्षांच्या राजकारणात कधीच असं पाहिलं नाही, अशा शब्दात मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, मोदी घटनात्मक संस्थांचा गैरवापर करत आहेत. सर्व त्यांच्या इशाऱ्यावर होत आलं आहे. लोकशाहीची चर्चा करतात, पण लोकशाहीनुसार काम करत नाहीत. मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. महाराष्ट्रातील बेकायदेशीर महायुती सरकारचा प्रचार पंतप्रधान करत आहेत. रॅलीत जाताना पंतप्रधान समाजाला तोडण्याची भाषा करत आहेत.
त्यांनी सांगितले की, लोकांना भडकविण्याचा काम ते करत आहेत. असं काम याआधी पंतप्रधान म्हणून कोणी केलं नसेल. 53 वर्षांच्या माझ्या राजकारणात हे असा कधी पाहिलं नाही. विश्वासघाताचा राजकारण सुरु आहे. धमकी देत राजकारणात पक्षांची तोडफोड केली जात आहे. निवडणूक आयोग, न्यायालय निर्णय जरी देत असले, तरी मोदींच्या इशाऱ्यावर यंत्रणा चालत आहेत. लोक नाराज आहेत.
Discussion about this post