जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी २ आणि २० डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) एकूण १८ पैकी १४ ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध केल्याने महायुतीचा दबदबा कायम राहिला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाजपचे ८ उमेदवारांनी बाजी मारली. तर शिवसेनेचे ६ उमेदवार नगराध्यक्ष झाले. तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार तर एक अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाले.
या ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले?
निकाल पाहता भाजपने जळगाव जिल्ह्यात चांगली कामगिरी नोंदवली आहे. जामनेरसह रावेर, सावदा, फैजपूर, एरंडोल, चाळीसगाव, शेंदुर्णी आणि नशिराबाद या एकूण आठ नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
या ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले?
तर पाचोरा, भडगाव, पारोळा, चोपडा, अमळनेर आणि मुक्ताईनगर या सहा नगर परिषदांमध्ये शिंदे गटाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या निकालांमुळे शिंदे गटाची जिल्ह्यातील पकड आणि संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात धरणगाव, भुसावळ, आणि यावल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. तर वरणगावमध्ये बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.
जिल्ह्यातील नगराध्यक्ष उमेदवारांचे नाव?
चाळीसगाव : प्रतिभा मंगेश चव्हाण (भाजप)
पाचोरा : सुनीता किशोर पाटील (शिवसेना)
शेंदुर्णी : गोविंदा अग्रवाल (भाजप)
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील (शिवसेना शिंदे गट)
एरंडोल : भाजपचे उमेदवार डॉक्टर नरेंद्र पाटील विजय
भडगाव : रेखा मालचे (शिवसेना शिंदे गट)
रावेर : संगीता महाजन (भाजप)
सावदा : रेणुका पाटील (भाजप)
जामनेर : साधना महाजन (भाजप)
वरणगाव : सुनील काळे (अपक्ष)
नशिराबाद : योगेश पाटील (भाजप)
पारोळा – डॉक्टर चंद्रकांत पाटील (शिवसेना शिंदे गट)
चोपडा – नम्रता पाटील (शिवसेना शिंदे गट)
यावल – छाया पाटील (शिवसेना ठाकरे गट)
फैजपूर – दामिनी सराफ (भाजप)
धरणगाव – लीलाबाई चौधरी (शहर विकास आघाडी)
अमळनेर – डॉक्टर परीक्षित बाविस्कर (शिवसेना शिंदे गट)
भुसावळ – गायत्री भंगाळे (शरद पवार गट)















Discussion about this post