मुंबई । राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला आलेल्या निवडणुकीचा निकाल काल १६ जानेवारीला जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली. या सर्व महानगर पालिकेवर महायुतीमधील भाजपसह सर्वच मित्र पक्षांना चांगले यश मिळून आले. या सर्व महापालिकांमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली. महत्वाचे म्हणजे या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. कारण या महापालिकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह १६ महानगर पालिकांवर भाजपची सत्ता आली आहे. राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक आले ते आपण एका क्लिकवर पाहणार आहोत….
राज्यात कुणाचे किती उमेदवार विजयी –
भाजप – १४२५ उमेदवार
बहुजन समाजवादी पार्टी – ६ उमेदवार
काँग्रेस – ३२४ उमेदवार
राष्ट्रवादी अजित पवार गट – १६७ उमेदवार
शिवसेना शिंदे गट -३९९ उमेदवार
मनसे – १३ उमेदवार
शिवसेना ठाकरे गट – १५५ उमेदवार
राष्ट्रवादी शरद पवार गट – ३६ उमेदवार
कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता?
मुंबई – भाजप-शिंदेसेना
ठाणे – शिंदेसेना- भाजप
नवी मुंबई- भाजप
कल्याण-डोंबिवली – शिंदेसेना- भाजप
उल्हासनगर – शिंदेसेना-स्थानिक आघाडी
भिवंडी-निजामपूर – त्रिशंकू
पनवेल- भाजप
मीरा-भाईंदर – भाजप
वसई-विरार – बविआ
नाशिक – भाजप
मालेगाव – स्थानिक आघाडी
धुळे- भाजप
जळगाव – भाजप
अहिल्यानगर- भाजप- राष्ट्रवादी अजित पवार गट
पुणे – भाजप
पिंपरी-चिंचवड – भाजप
सांगली-मिरज-कुपवाड – भाजप
सोलापूर – भाजप
कोल्हापूर – महायुती
छत्रपती संभाजीनगर – भाजप
परभणी – महाविकास आघाडी
नांदेड- वाघाळा – भाजप
लातूर- काँग्रेस
अमरावती – भाजप-युवा स्वाभिमान
अकोला – भाजप
नागपूर – भाजप
चंद्रपूर – काँग्रेस
जालना – भाजप
इचलकरंजी – भाजप















Discussion about this post