नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबईमधील २७७१ होमगार्डच्या जागा भरण्यात येणार आहे. महिला व पुरुष पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. होमगार्ड पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे. ()
होमगार्ड पदाबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. होमगार्डमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक तरुणांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या वेबसाइटवर जाऊन माहिती वाचावी.
पोलिस दलातील अपुऱ्या संख्येमुळे पोलिसांवर कामाचा ताण येत होता. त्यामुळे बंदोबस्ताचा भार होमगार्डवर सोपवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा होमगार्ड पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २७७१ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. १० जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.
होमगार्ड पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची उंची १६२ सेमी असावी. तर महिलांची उंची १५० सेमी असणे गरजेचे आहे.
होमगार्ड नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला रहिवासी पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, जन्मतारीख, १०वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असते. तुम्हाला हे कागदपत्रं अपलोड करावे लागतील.
Discussion about this post