बदलापूर | बदलापूरमध्ये जमावाचा उद्रेक ; गृहमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णयमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून या घटनेनंतर बदलापूरकरांनी आंदोलन पुकारले आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकांवर ठिय्या आंदोलन केलं. सरकारडून मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
पण आंदोलक माघार घ्यायला तयार नसून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत. कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
Discussion about this post