सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. डायरेक्ट्रेट जनरल ऑफ होम गार्ड्स, गवर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्याकडून भरती राबविली जात आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 10 हजाराहून पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आरामात आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरू शकते.
इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. dghgenrollment.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.
पात्रता : होमगार्ड भरतीसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. परंतु माजी सैनिक आणि माजी CAPF कर्मचार्यांसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण आहे.
वयाची अट :
उमेदवारांचे वय 20-45 वर्षे असावे (म्हणजे 02-01-1979 च्या आधी जन्मलेले नाही आणि 01-01-2004 च्या नंतर नाही)/(माजी सैनिक/माजी CAPF कर्मचार्यांसाठी 54 वर्षांपर्यंत).
शारीरिक पात्रता
अर्ज करण्यासाठी, पुरुष उमेदवारांची किमान उंची 165 सेमी आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेमी असावी.
दिल्ली होम अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना रु 100/- + सुविधा शुल्क भरावे लागेल.
अर्ज करण्याची पद्धत :
https://dghgenrollment.in/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील दिल्ली होमगार्ड भर्ती 2024 लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक, शैक्षणिक तपशीलांसह आवश्यक तपशील प्रदान करा.
अर्ज सादर करा.
आवश्यक कागदपत्रे जमा करा.
भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.
Discussion about this post