नवी दिल्ली :
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. यामध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक सेंगोल अर्थात राजदंडाची स्थापना पंतप्रधान मोदींनी केली आहे.
पीएम मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या पूजेला बसले होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला. हे राजदंड हातात घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.
देशाच्या नवीन संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या शेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे. भारताचे नवीन संसद भवन इतके सुंदर आणि आलिशान आहे की त्यापुढे परदेशी संसदही फिके पडत आहे. या संसद भवनाची रचनाच खूप अप्रतिम करण्यात आली आहे. ज्या मजूरांनी या संसद भवनाची इमारत बांधली त्यांची यावेळी मोदींनी भेट घेतली. राजदंड बसवल्यानंतर मोदींनी या मजुरांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांचा सन्मान केला. नव्या संसद भवनाच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध भाषेत परमात्म्याचं स्मरण करण्यात आलं.
या नव्या संसद भवनाची उभारणी टाटा प्रोजेक्टस लिमिटेडकडून करण्यात आली आहे. या संसद भवनात लोकसभा राज्यसभा यासह भव्य संविधान कक्ष, खासदारांसाठी लाऊंज पुस्तकालय, समिती कक्ष, भोजन क्षेत्र आणि पार्किंग व्यवस्था असेल.त्रिकोणी आकाराच्या चार मजली इमारतीचं क्षेत्रफळ ६४ हजार ५०० वर्ग मीटर इतकं आहे. या संसद भवनाला तीन प्रवेश द्वारं आहेत. त्यामध्ये ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार आहे. सामान्य व्यक्ती आणि महत्त्वाच्या व्यक्तीसाठी वेगवेगळी प्रवेशद्वारं आहेत.
Discussion about this post