हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये एकूण १९५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या पदासाठी भरती?
यामध्ये डीझेल मॅकेनिक, फिटर, टर्नर, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिशियव, ड्रॉट्समॅन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, कारपेंटर, प्लंबर, इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक, सोलर टेक्नीशियन पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी किंवा १२वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. १० वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. २० ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर जाऊन अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.apprenticeship.gov.in. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.यानंतर तुम्ही hindustancopper.com या वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करु शकतात.















Discussion about this post