सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
एचएएलमध्ये ८१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.एचएचएलच्या नॉन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदासाठी नेहमी भरती जाहीर केली जाते.
या नोकरीसाठी तुम्ही ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.याबाबत अधिकृतपणे अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
या नोकरीसाठी ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स), ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स सी-५), ऑपरेटर (मेकॅनिकल ) स्केल डी-६, लॅब ऑपरेटर (स्केल C-5)पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांना २२००० ते २३००० रुपये वेतन मिळणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.
सध्या डीआरडीओ आणि नाबार्डमध्येही भरती सुरु आहे. डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे तर नाबार्डमध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तर डीआरडीओमध्ये ग्रॅज्युएट, टेक अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.















Discussion about this post