पुणे । राज्याच्या काही भागात उन्हाचे चटके जाणवत असतानाच, पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आज रविवारी (ता. ७) पावसाचा इशारा, तर सोमवारी (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे.
राज्यात शनिवारी सोलापूरमध्ये ४२.४ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड यांसह विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक होता. ढगाळ वातावरणामुळे जळगावचा पारा शनिवारी ४० अंशखाली आला होता.
या भागात अलर्ट जारी
नागपूर, गोंदिया, यवतमाळ या ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाती शक्यता वर्तवण्यात येत आहे. अकोल्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
Discussion about this post