मुंबई । राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अधिवेशनात जाणाऱ्या आमदारांनाही बसला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. त्यामुळे काही आमदारांनी रेल्वे रुळावरुन चालत प्रवास केला.
सिधेश्वरी एक्सप्रेसने मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी अधिवेशनासाठी मुंबईकडे येत होते. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे यावेळी लोकल विद्याविहारच्या पुढे जाईना. त्यामुळे नेतेमंडळी रस्त्यातच अडकून पडली होती. त्यानंतर हे दोघेही रेल्वेतून उतरले अन् त्यांनी चालत कुर्ला रेल्वे स्थानक गाठलं.
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत परिस्थिती सांगितली आहे. दादर आणि कुर्ला स्थानकाच्या मध्ये राज्याचे मदत आणि पुर्नवसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मी आणि आणखी या ट्रेनमध्ये सात ते आठ आमदार अडकून आहेत. सध्या आम्ही एक वेगळा अनुभव घेत आहोत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज विधीमंडळ अधिवेशनचा अंतिम आठवडा सुरु आहे. त्या अधिवेशनात जाण्यासाठीही प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल, अशी अपेक्षा करतो. याचा सर्वसामान्य लोकांनाही फटका बसला आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.















Discussion about this post