जळगाव/मुंबई । चक्रीवादळामुळे यंदा पावसाळा लांबला. तब्बल २० ते २२ दिवस पावसांनंतर राज्यात मान्सूनने हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
अशातच हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.येत्या काही तासात विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
या जिल्ह्यांना नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Discussion about this post