देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 45.6 अंश सेल्सियस गेला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक बेजार झाले असून यापासून दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीय. यातच हवामान खात्यानुसार, यापुढे काही दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी जारी भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने म्हटले आहे की, पूर्व आणि दक्षिण भारतात आणखी ५ दिवस उन्हाची लाट येण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंडच्या काही भारात १ मे आणि २ मे रोजी उष्णतेचा तडाखा कायम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायलसीमा, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमधील काही भागात ३ मेपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते. तर २९-३० एप्रिलदरम्यान कोकण, पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेच्या तीव्र झळा बसतील, असे सांगण्यात येत आहे.
सोमवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सियस होते.पूर्व प्रदेश, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, यानम या भागांमध्ये ४० ते ४२ अंश सेल्सियस तापमान होते. तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात देखील ४० ते ४२ अंश सेल्सियस तापमान होते. पश्चिम बंगालच्या अनेक भागात तापमान सामन्य तापमानापेक्षा ४ ते ८ अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. IMD ने एप्रिल- जूनमध्ये देशातील बहुतांश भागात कडक उन्हाचा इशारा दिला आहे. पुढील १०-२० दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशात एकीकडे तापमान वाढत आहे. तर दुसरीकडे वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व अफगाणिस्तान आणि वायव्य राजस्थानवर चक्रिवादळामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गारपीट तर जम्मू काश्मीर, मुझफ्फराबाद येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.















Discussion about this post