जेवणात चव वाढवणारी हिरवी मिरची आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर ठरू शकते. या लहानशा मिरचीमुळे आरोग्याला महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. हिरव्या मिरच्यांमधील कॅप्सायसिन हा घटक शरीरातील चयापचय क्रिया वाढवून वजन नियंत्रणास मदत करू शकतो. तसेच पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही हिरवी मिरची उपयुक्त ठरते.
चयापचयास मदत करू शकते :
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमची चयापचय क्रिया वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिरव्या मिरच्या यात मदत करू शकतात. त्यातील कॅप्सायसिन थर्मोजेनेसिस वाढवू शकते, ज्यामुळे शरीराला थोड्या अधिक कॅलरीज जाळण्यास मदत होते.
मिरच्यांमध्येही व्हिटॅमिन सी
आवळ्याप्रमाणेच हिरव्या मिरच्यांमध्येही व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते? दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने सर्दी आणि फ्लू सारख्या किरकोळ आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. तसेच, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येण्यासही मदत होते.
मात्र, काही महिलांनी हिरवी मिरची खाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्या महिलांना अॅसिडिटी, पोटातील जळजळ किंवा पचनासंबंधित समस्या आहेत, त्यांनी मिरचीचे सेवन मर्यादित ठेवावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान, निरोगी महिलांसाठी दररोज १ ते २ लहान हिरव्या मिरच्या खाणे सुरक्षित मानले जात असले तरी अति सेवन टाळणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.















Discussion about this post