निसर्गाने दिलेला काही ठेवा आपल्या हातातून अलगद निसटत चालला आहे. मात्र याला अपवाद आहे तो दक्षिण भारत. आजकाल स्टील आणि इतर धातूंच्या भांड्यांच्या वापराकडे सर्वांचाच ओढा आहे. मात्र, दक्षिण भारतात आजही अनेक ठिकाणी केळीच्या पानाचा वापर देवाला नैवेद्य आणि जेवणासाठी केला जातो. महत्त्वाचं म्हणजे याच केळीच्या पानांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का. चला तर मग आज आपण हेच जाणून घेऊयात.
सौंदर्यासाठी फायदेशीर
केळीच्या पानांवर नियमितपणे जेवल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ते अधिक चमकदार बनतात.तसच डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
हृदय सुरक्षित
केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं.यामुळे हृदयाचं काम सुधारतं. शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राहतं.
पचनक्रिया सुरळित होते
केळीच्या पानांमध्ये वनस्पती-आधारित संयुगं भरपूर असतात. यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि पचनसंस्थेचे विकार दूर होण्यास मदत होते.
नैसर्गिक जंतुनाशक
केळीच्या पानांवर जेवल्याने आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते.पोटाच्या समस्या दूर होतात.
पौष्टिक मूल्य
केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जेव्हा केळीच्या पानात जेवायला वाढतो.तेंव्हा ते पानतील पॉलीफेनॉल्स शोषून घेतात. आणि जेवणाद्वारे ते आपल्या शरीरात जातात.आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो.
Discussion about this post