तुमचेही खाते एचडीएफसी बँकेत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. याचा थेट परिणाम हा लोनवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीपूर्वीच एचडीएफसी बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेने २०२५ च्या सुरुवातीलाच रेपो रेट कमी केला आहे. यामुळे कर्जाचा हप्ता कमी झाला आहे. यानंतर आता एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये रेपो रेट आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. एमसीएलआर हे कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी मदत करते. जर एमसीएलआर रेटमध्ये कपात झाली तर कर्जावरील व्याजदरातदखील कपात होईल. एचडीएफसी बँकेने हे नवीन एमसीएलआर रेट आजपासून लागू केले आहे. त्यामुळे जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर होम लोनवरील व्याजदर कमी होणार आहे.
एमसीएलआर रेट हे एका महिन्यासाठी एमसीएलआर (MCLR) ९.२० टक्के होते. त्यात ०.१० टक्क्यांनी कपात झाली आहे. म्हणजेच आता एमसीएलआर ९.१० टक्के असणार आहे.तीन महिन्याचा रेट ९.३० टक्के होता.तो कमी होऊन ९.२० टक्के झाला आहे. सहा महिने ते २ वर्षांचा रेट कमी होऊन ९.३० टक्के करण्यात आला आहे. हा रेट आधी ९.४० टक्के होता.
Discussion about this post