मुंबई । तुमचंही खाते देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. काही ठरावीक कर्जावरील एमसीएलआर रेट ५ बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना खूप फायदा होणार आहे. यामुळे नवीन कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. एमसीएलआरमध्ये कपात झाल्यावर तुमच्या व्याजदरातदेखील बदल होणार आहे.
एचडीएफसी बँकेचे हे नवीन व्याजदर ८ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये ६ महिन्यांपासून ते १ वर्षांपर्यंतचे एमसीएलआर रेट ५ बेसिस पॉइंट्सने कमी झाले आहे. हे दर आधी ८.७० टक्के होते. ते आता ८.६५ टक्के झाले आहे.
दोन वर्षांसाठी कालावधीच्या लोनवरीलदेखील व्याजदर कमी झाले आहे. हे दर ८.७५ वरुन ८.७० टक्के होणार आहे. परंतु एका दिवसासाठी, एका महिन्यासाठी किंवा ३ महिन्यांसाठी घेतलेल्या लोनवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. एका महिन्यासाठीचे व्याजदर ८.५५ टक्के असणार आहे. तीन महिन्यासाठीचे व्याजदर ८.६० टक्के असणार आहे. याचसोबत तीन वर्षांच्यासाठीचे लोनवरीलदेखील एमसीएलआर रेट बदलले नाहीत.हे दर ८.६५ टक्के आहेत.
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिग रेट. याचा थेट परिणाम व्याजदरावर होतोय. यावरुन तुमचे व्याजदर वाढणार की कमी होणार हे ठरवले जाते. दरम्यान, एमसीएलआर रेटमध्ये कपात केल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. गृहकर्ज आणि कार लोनवरील व्याज कमी झाले आहेत.
याआधी जवळपास दोन महिन्यापूर्वी एमसीएलआर रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली. रेपो रेट ५.५ टक्के निश्चित करण्यात आला. यानंतर एचडीएफसी बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला.















Discussion about this post